Wednesday, June 24, 2009

अपेक्षा

अपेक्षा
अपेक्षा तर असणारच ... पण मी त्या स्पष्ट सांगणार नाही ... तू त्या समजुन घ्यायला हव्यास ... आणि पूर्ण ही करायला हव्यास ... जर तू तुज्याच नादात असलास ... मला काय हवय हे तुज्या लक्ष्यातही आल नाही ... तर ती तुजी चुक ...
वेळ निघून गेल्यावर मी तुला बोलून दाखवींनही ... किव्हा कदाचित नाहीही ... तुज्यबदलचा एक गैरसमज एक अढी ... एक सल मात्र माज्या मनात कायमचा जपून ठेवी ... की तू असाच ... जे मी तुज्यासाठी केल ... ते सार तू विसरलास ... नव्या जगत रमताना तुला माजी आठवणही येत नाही.
... हो ! आणखी एक ... तर तुही माज्यसाठी अनेक गोष्टी केल्यास ... किव्हा करतोसाही ... पण त्या दिवशी मात्र ... तू अस का वगालास ....
त्या एका गोष्टीन मात्र ते सार पुसल गेल ... आता माज मन फक्त तुजी चूकच उगाळत राहिल ... तू केलेल्या अपेक्ष्याभंगाच दुःखच कुरवाळत राहिल ... अनेक चांगल्या गोष्टी तश्या विसरायलाच होतात नाही का ... कारन कितीही चांगल्या गोष्टीनपेक्षअहि एक लहानशी चूकच इतकी प्रभावी असते ... पण हे मी तुला कधीच सांगणार नाही ... माज दुःख .. माजे समज ... गैरसमज .. सार काही माज्यपुरतच ... ! तुला कश्याला उगीच दुखावयाच ... ?

No comments:

Post a Comment